15.08.2023: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज गणेशखिंड, पुणे येथील राजभवन येथे प्रथेनुसार चहापान व स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. चहापानाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, एमआयटी विश्व शांती केंद्राचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, अस्थिविकार तज्ज्ञ डॉ के एच संचेती, ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, गायक शौनक अभिषेकी, सलील कुलकर्णी, सावनी शेंडे व आर्या आंबेकर यांसह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व पालक मंत्री यांनी निमंत्रितांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.