14.08.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारोह पुणे येथे संपन्न
14.08.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 14 वा दीक्षांत समारोह पुणे येथे संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती अरुण फिरोदिया, अध्यक्ष, कायनेटिक समुह, पुणे, प्रज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ प्रमोद चौधरी व बेंगलोर येथील रमैया समुहाचे मुख्य सल्लागार डॉ पी एन राझदान यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्यात आले. दीक्षांत समारोहात 4095 स्नातकांना पदव्या तर 33 स्नातकांना सुवर्ण पदके देण्यात आली. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलपती डॉ. (श्रीमती) भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
14.08.2023: Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 14th Convocation of the Dr DY Patil University in Pune. Chairman of the Kinetic group Arun Firodia, founder of Praj Industries Dr Pramod Chaudhari and Chief Advisor of Ramaiya Group of Institutions Bangalore Dr P.N. Razdan were presented the honorary degree of Doctor of Science by the Governor. Degrees were presented to 4095 students while Gold Medals were awarded to 33 graduates topping various examinations. Chancellor of the University Dr P.D. Patil, Pro Chancellor Smt Bhagyashri Patil, Vice Chancellor Dr NJ Pawar and members of the Managing Committee of the university, Faculty, parents, staff and graduating students were present.