14.04.2024 : १३३ व्या डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
14.04.2024 : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमी स्मारक येथे डॉ आंबेडकरांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली तसेच राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवर दान (वस्त्र) करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मुंबई शहर कार्यालयातर्फे चैत्यभूमी येथे मतदार जागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत राज्यपालांनी 'मी मतदानाचा हक्क बजावणारच' लिहिलेल्या फलकावर स्वाक्षरी केली.
14.04.2024: Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to Bharat Ratna Dr B R Ambedkar at the Chaitya Bhoomi in Mumbai on the occasion of the 133rd Birth Anniversary of the Architect of the Indian Constitution. The Governor presented the holy clothes (Cheevar) to Bouddha Monks on the occasion. Municipal Commissioner of Mumbai and Administrator Bhushan Gagrani, Additional Municipal Commissioner Dr Ashwini Joshi, Collectors of Mumbai City and Suburban districts, Bhante Rahul Bodhi, General Secretary of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Samiti Nagsen Kamble were among those present. The Governor also endorsed the Voter Awareness Campaign organised by the Collectorate of Mumbai at Chaityabhumi by signing on the flex board which read "I shall cast my vote".