13.01.2024: राज्यपालांच्या हस्ते संजय मुखर्जी, प्रवीण दराडे यांसह ‘नव भारत’चे शिल्पकार सन्मानित तसेच ‘शिव राज्याभिषेक ३५० वर्ष’ या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन
13.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रशासन, पोलीस, आरोग्यसेवा, समाजकार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ६५ व्यक्तींना 'नव भारत के शिल्पकार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, माजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील व नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी पल्लवी दराडे, स्नेहलता कोल्हे (संजीवनी समूह), राजेश गोयल (कोहिनुर समूह), महानगर पालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगर जी श्रीकांत, पोलीस आयुक्त अमरावती नवीनचंद्र रेड्डी, शशांक परांजपे (परांजपे स्कीम), चिंतन देसाई (सोसायटी टी) आदींना 'नव भारत के शिल्पकार' पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या प्रकाशनाचे ९० वर्षे साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून नवभारत समूहातर्फे 'शिव राज्याभिषेक ३५० वर्ष' या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
13.01.2024: Governor Ramesh Bais presented the 'Nav Bharat Ke Shilpakar' award to MMRDA Commissioner Dr Sanjay Mukherjee, Principal Secretary Environment Pravin Darade among others in Mumbai. The Governor also released the Coffee Table book 'Shiv Rajyabhishek- 350 years' brought out by the group to mark the 350th anniversary of the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj. Member of Parliament Poonam Mahajan, former Minister Harshwardhan Patil, Managing Director of Nava Bharat Group Nimish Maheshwari were prominent among those present. Harshwardhan Patil, former Minister and Chancellor of Pimpri Chinchwad University Pune, IRS officer Pallavi Darade, Snehalata Kolhe (Sanjeevani Group), Rajesh Goyal (Kohinoor Group), G Sreekanth, Municipal Commissioner, Chhatrapati Sambhaji Nagar, Navinchandra Reddy, Commissioner of Police Amravati were among those felicitated by the Governor.