12.09.2023 : राज्यपालांनी दिली क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट
12.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी चिंचवड पुणे येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट देऊन ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आदींची पाहणी केली. राज्यपालांच्या उपस्थितीत क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या 'पुनरुत्थान गुरुकुलम्'च्या सुवर्ण महोत्सवी सांगता झाली. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह मिलिंद देशपांडे, सचिव सतीश गोरडे उपस्थित होते.