11.01.2022 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
11.01.2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांत समारोहात १२,२३९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तसेच ६२ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी व ५५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी करुणा उकिरडे या विद्यार्थिनीचा ४ सुवर्ण पदके मिळाल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.