10.06.2023: राज्यपालांच्या उपस्थित लोकमतच्या अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवीवर्षपूर्ती सोहळा संपन्न
10.06.2023: 'लोकमत'चे संस्थापक राज्याचे माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमतच्या अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अकोला येथे संपन्न झाला. यावेळी दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या वरील टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले तसेच नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या 'सुवर्ण मुद्रा' ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अकोला आवृत्तीच्या 'पंचविशी' या विशेषांकाचे तसेच 'वुमन अचिव्हर्स अवॉर्ड्स' या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा व समूह संपादक विजय बाविस्कर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वऱ्हाड प्रांतातील कर्तृत्ववान व्यक्तींचा तसेच विदर्भ आवृत्तीशी संबंधित संपादक व पत्रकारांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
10.06.2023: The birth centenary year of the founder of 'Lokmat', former minister Jawaharlal Darda and the silver jubilee year of the Akola edition of 'Lokmat' were celebrated in presence of Maharashtra Governor Ramesh Bais at Akola. The Governor released a postage stamp and the books 'Suvarna Mudra', 'Panchvishi' and 'Women Achievers' Awards' on the occasion. Minister of Agriculture Abdul Sattar, Lokmat Media Group Chairman Vijay Darda, Lokmat Editor-in-Chief Rajendra Darda, Group Editor Vijay Baviskar and invitees were present on the occasion. The Governor released the special issue 'Panchvashi' of the Akola edition and the Coffee Table Book 'Women Achievers Awards'. Eminent personalities from the Varhad province were felicitated at the hands of the Governor.