10.02.2025 : संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन संपन्न
10.02.2025 : 'वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना' या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उदघाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा सदर अभियानाचा उद्देश आहे. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गावदेवी मुंबई केंद्राच्या सहकार्याने आयोजित उदघाटन सोहळ्याला ब्रह्मकुमारी कला आणि सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा राजयोगिनी चंद्रिका दीदी, राजयोगिनी पूनम दीदी, ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि पद्मिनी कोल्हापुरी, विविध केंद्रांतील ब्रह्मकुमारी तसेच राजभवन येथील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.