09.04.2023 : नासा येथे अभ्यास दौऱ्यावर जाणाऱ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून शाबासकी
09.04.2023 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्राथमिक शाळांमधील इयत्ता सातवीच्या ९ विद्यार्थ्यांची 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला अभ्यास भेट देण्यासाठी निवड करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी व त्यांच्यामधून देशासाठी वैज्ञानिक घडावे या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव व इतर अधिकारी हे देखील उपस्थित होते.