08.01.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५ वा वार्षिकोत्सव साजरा
08.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत केरळ ख्रिश्चन कौन्सिल, मुंबई या संस्थेचा ६५ वा वार्षिकोत्सव तसेच ख्रिसमस व नववर्ष स्वागत समारोह कॅनोसा सभागृह अंधेरी मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला मल्याळी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेते रेंजी पणिकर, केरळ ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाबू वर्गिस, महासचिव सायमन वर्की, निमंत्रक बिनु चंडी, ख्रिस्ती धर्मगुरू तसेच परिषदेचे सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते ६५ व्या वार्षिक दिन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.