07.12.2022 : बंजारा भाषेतील ‘संत मारो सेवालाल’ चित्रपटाच्या पोस्टर व टीजरचे राजभवन येथे प्रकाशन’
07.12.2022 : बंजारा भाषेतील 'संत मारो सेवालाल' चित्रपटाच्या पोस्टर व टीजरचे राजभवन येथे प्रकाशन'
07.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बंजारा भाषेतील संत मारो सेवालाल या चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले. चित्रपटाच्या माध्यमातून जल संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला संत सेवालाल यांचे वंशज महंत जितेंद्र महाराज, चित्रपटाच्या सहनिर्मात्या दिपाली भोसले सय्यद, लेखक-दिग्दर्शक अरुण मोहन राठोड, जितेश राठोड तसेच चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.