06.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते २८ व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
06.11.2022 : नृत्य सम्राज्ञी सितारा देवी यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून भवन्स क्लचर सेंटर व्दारे आयोजित २८ व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत अंधेरी, मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कला कृती केंद्राच्या अध्यक्षा जयंती माला मिश्रा, नाट्य कलाकार राजेश मिश्रा, ऋषिका मिश्रा, पं. कालिनाथ मिश्रा, सोमनाथ मिश्रा, सौरव मिश्रा, गौरव मिश्रा, हिरोको सारा फुकुडा, अपर्णा देवधर, संदीप मिश्रा, कुणाल पाटील, बालकिशन मिश्रा, किशन मिश्रा, गुरु केतकी तांबे, दिलीप तांबे व डॉ वैदेही रेळे लाल या कलाकरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नृत्यांगना ऋषिका मिश्रा यांनी पद्मश्री नृत्य साम्राज्ञी सितारा देवी यांची कथ्थक मधील प्रसिद्ध चाल 'उछाल' सादर केली तसेच इतर नर्तकांनी कथ्थक, ओडिसी व भरतनाट्यम् नृत्य सादर केले.