04.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘संस्कार व संस्कृती संवर्धन’ कार्यक्रम संपन्न
04.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'संस्कार व संस्कृती संवर्धन' कार्यक्रम संपन्न
04.12.2022 : श्रीमद्भगवद्गीता जयंतीचे औचित्य साधून माहेश्वरी मंडळ भायंदर यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे लहान मुलांच्या 'संस्कार व संस्कृती संवर्धन' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी शांतिमंत्र तसेच गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण केले. गीतेतील भक्तियोग अध्याय पाठ केल्याबद्दल मुलांना कौतुकाची थाप देताना राज्यपालांनी त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माहेश्वरी समाजातर्फे करोना काळात केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल तसेच मूक प्राण्यांप्रती केलेल्या कार्याबद्दल समाज बांधवांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला माहेश्वरी मंडळ भायंदरचे अध्यक्ष नटवर डागा, सचिव नारायण तोष्णीवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.