02.02.2023 : शानदार प्रदर्शनाबद्दल राज्यपालांकडून एनसीसी कॅडेट्सना कौतुकाची थाप
02.02.2023 : नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी होऊन अत्यंत प्रतिष्ठेचे पंतप्रधानांचे निशाण तसेच सर्वोत्कृष्ट संचालनालयाच्या खिताब पटकावल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला तसेच अधिकाऱ्यांना राजभवन मुंबई येथे निमंत्रित करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्र चमूला मिळालेल्या वैयक्तिक तसेच सांघिक चषकांची पाहणी केली व कॅडेट्सना सन्मानित केले. यावेळी एनसीसी महाराष्ट्राचे अपर महासंचालक मेजर जनरल योगेंद्र प्रसाद खंडूडी, कर्नल निलेश पाथरकर, महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झालेले १११ कॅडेट्स उपस्थित होते.