बंद

    Address by Governor at the felicitation of the best ranked Panchayati Raj Institutions under the Yashwant Panchayat Raj Abhiyan

    प्रकाशित तारीख: October 26, 2018

    Address by Shri Ch. Vidyasagar Rao, Governor of Maharashtra at the felicitation of the best ranked Panchayati Raj Institutions under the ‘Yashwant Panchayat Raj Abhiyan’ organized by Government of Maharashtra at Ravindra Natya Mandir, Prabhadevi, Mumbai at 10.30 AM on Friday, 26th October 2018

    Smt Pankaja Gopinath Munde, Hon’ble Minister for Rural Development and Women & Child Welfare, Shri Aseem Kumar Gupta, Secretary, Rural Development and Panchayati Raj, Shri Jagdish Patil, Divisional Commissioner, Konkan Division, elected heads and representatives of Zilla Parishads and Panchayat Samitis, officers and staff of various departments, family members of awardees, ladies and gentlemen…

    नमस्कार. आपणा सर्वांना भेटून खूप आनंद वाटला. आज, मी आपल्याशी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. चूक झाल्यास, समजून घ्यावे.

    सर्व प्रथम राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो.

    यशवंत पंचायत राज अभियानातील सर्व उत्कृष्ट पंचायत समिती व जिल्हा परिषदांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

    मी, सर्व पुरस्कार प्राप्त, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोक-प्रतिनिधींचे, तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील हार्दिक अभिनंदन करतो.

    महाराष्ट्र राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

    त्यामुळे, राज्याच्या पंचायत राज संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ही लोकशाहीच्या दृष्टीने तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे.

    आज येथे महिला सदस्य तसेच अधिकारी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्या सर्वांचे मी विशेष अभिनंदन करतो.

    यशवंत पंचायत राज अभियान, गेली अनेक वर्षे, अतिशय उत्तम रितीने राबविल्याबद्दल मी, महाराष्ट्र शासनाचे आणि विशेषतः ग्राम विकास आणि पंचायती राज विभागाचे, अभिनंदन करतो.

    बंधुंनो आणि भगिनींनो,

    देशातील प्रत्येक गाव, आर्थिक दृष्ट्या, आत्म निर्भर गणराज्य असावे, असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. त्यामुळे स्वावलंबन आणि स्वपरिपालन हे आपले ध्येय असले पाहिजे.

    आज पंचायत राज संस्था, ग्रामीण, निमशहरी तसेच शहरी महाराष्ट्राच्या विकासात, महत्वपूर्ण योगदान देत आहेत. पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या अनेक विकास योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.

    अनुसूचित क्षेत्रात पेसा कायद्याची अंमल बजावणी चांगली होत आहे. त्या ठिकाणी तेंदू, मध, बांबू यांच्या संकलन आणि विक्रीचे अधिकार ग्राम पंचायतींना देण्यात आले आहेत. बांबूविक्रीमुळे अनेक ठिकाणी क्रांती झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेचा मोठा फायदा झाला आहे.

    अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी विकास विभागाकडून ५ टक्के निधी थेट देण्यात येत आहे. याचा मोठा लाभ तेथील ग्राम पंचायतींना मिळत आहे. या निधिचा विनियोग करताना, प्राधान्यक्रम ठरवून दिल्याबद्दल, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो.

    घटनेतील त्र्याहत्तराव्या दुरुस्तीला अभिप्रेत पंचायत राज संस्था सबळ करण्यासाठी त्यांना अपेक्षित सर्व अधिकार, मनुष्यबळ आणि निधी देणे आवश्यक आहे. या दृष्टीने शासन प्रयत्नशील राहील असा मला विश्वास वाटतो.

    बंधुंनो आणि भगिनींनो,

    अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत एक अतिशय संपन्न राष्ट्र होते. याचे कारण, आपली गावे समृद्ध होती. त्यामुळे, गाव समृद्ध झाले तरच देश समृद्ध होईल. यासाठी शेतीला उद्योग – धंद्याची जोड दिली पाहिजे. ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वार्षिक प्रदर्शन न राहता तो लघुउद्योग झाला पाहिजे.

    यंदा राज्याच्या काही भागात पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जल संवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचविता येईल याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. लोक-सहभागातूनच गावे सुजलाम – सुफलाम होतील, असे मला वाटते.

    पुढील वर्षी आपण महात्मा गांधी यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करणार आहोत. त्यापूर्वी प्रत्येक गावात पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे आहेत हे सुनिश्चित केले पाहिजे. स्वच्छतेसोबत स्वच्छ उर्जा निर्मिती, जल संवर्धन, शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे. त्यातूनच गावांचा परिपूर्ण विकास साधता येईल.

    पुरस्कार प्राप्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे तसेच तेथील लोकप्रतिनिधी आणि गुणवंत अधिकारी – कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो. आपणा सर्वांना दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!