बंद

    05.08.2026: देख ले ! इंडिया: टाळ्यांच्या कडकडाटात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार

    प्रकाशित तारीख : August 5, 2026
    05.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह भारताच्या पहिल्या राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांचा लोकभवन येथे भव्य सत्कार केला. दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वचषक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या संघाच्या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    देख ले ! इंडिया: टाळ्यांच्या कडकडाटात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार

    अंध महिलांच्या टी २० विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा आज टाळ्यांच्या कडकडाटात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे हृद्य सत्कार करण्यात आला.
    भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसेच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले ! इंडिया’ या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) लोकभवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू, संघाचे अध्यक्ष डॉ महांतेश जी के, प्रशिक्षिका शिखा शेट्टी तसेच दिव्यांगांच्या शाळा व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    काही दिवसांपूर्वी आपण ‘देख ले !इंडिया’ या महिला क्रिकेट संघाच्या प्रवासाच्या माहितीपटाचे ट्रेलर पाहिले. हा माहितीपट केवळ एखाद्या क्रिकेट संघाच्या विजयाची गाथा नसून तो दिव्यांग महिला खेळाडूंसमोरील सामाजिक – आर्थिक आव्हाने, त्यांच्यामध्ये दिसून येत असलेली कुटुंबाच्या जबाबदारीची भावना, समानतेसाठी त्यांचा लढा व परिश्रमपूर्वक मिळवलेल्या विजयाचे सजीव चित्रण आहे. त्यामुळे आपण माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित केले असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. अंध महिला क्रिकेटपटूंनी केवळ विश्व चषक जिंकला नाही तर देशातील करोडो भारतीयांचे हृदय जिंकले असल्याचे त्यांनी सांगितले.
    ‘देख ले ! इंडिया’ हा माहितीपट अधिकाधिक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये दाखविण्याबाबत आपण संबंधितांना सूचना देऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
    विद्यापीठांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी आपल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. शासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम, कॉर्पोरेट व खासगी क्षेत्राने देखील दिव्यांग खेळाडूंना रोजगाराची संधी द्यावी असे आवाहन देखील राज्यपालांनी केले.
    आज माध्यमांच्या सुकाळात माहिती भरपूर मिळते, चित्रपटात तंत्रज्ञानाचा वापर देखील अधिक असतो परंतु त्यातून प्रेरणा मिळत नाही. त्याउलट ‘देख ले ! इंडिया’ हा माहितीपट अतिशय प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
    भारतात क्रिकेटपटूंना मान सन्मान मिळतो, त्यांच्या खेळांना स्पॉन्सरशिप मिळते. परंतु दिव्यांग खेळाडूंकडे प्रतिभा असून देखील पुरेशी मान्यता मिळत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंध महिला खेळाडूंना गरिबी, घरातून होणारा विरोध, शारीरिक आव्हाने यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांची क्रिकेटमधील वाटचाल विशेष गौरवास्पद ठरते असे राज्यपालांनी सांगितले.
    अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत करून विश्वचषक जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खेळाडूंचे कौतुक केले. हा विजय आत्मविश्वासाचा असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग खेळाडूंना सहानुभूती नको तर संधी हवी असे सांगून अंध महिला क्रिकेटपटूंना मिळाल्यावर त्यांनी तिचे सोने केले असे त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ‘देख ले इंडिया’ माहितीपटाच्या निर्मात्या शांती मोहन व दिग्दर्शक मुकुंद मूर्ती यांचे अभिनंदन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी खेल रत्न, अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्यांग खेळाडू डॉ दीपा मलिक यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी अंध महिला संघाच्या सदस्य सिमू दास, प्रिया खीर, अनु कुमारी, जमुना राणी टुडू , काव्या, अनेखा देवी, बसंती हंसदा, सिमरणजित कौर, सुनीता सराटे, पर्बती मरांडी, कर्णधार दीपिका टी सी, फुला सोरेन, उपकर्णधार गंगा कदम, काव्या एन आर, सुषमा पटेल, दुर्गा येवले, क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडिया (CABI ) चे अध्यक्ष डॉ महांतेश जी के व चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांचा सत्कार करण्यात आला.
    **
    देख ले! इंडिया’: लोकभवन में विश्व विजेता दृष्टिबाधित महिला क्रिकेट टीम का भव्य सम्मान

    मुंबई, 5 अगस्त: दृष्टिबाधित महिला टी-20 विश्व कप जीतकर भारत का गौरव बढ़ाने वाली भारतीय दृष्टिबाधित महिला राष्ट्रीय क्रिकेट टीम की खिलाड़ियों का आज महाराष्ट्र लोकभवन में राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा के करकमलों द्वारा जोरदार तालियों की गड़गड़ाहट के बीच भावपूर्ण सम्मान किया गया।

    भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेट टीम एवं उसकी खिलाड़ियों की प्रेरणादायी यात्रा पर आधारित वृत्तचित्र ‘देख ले! इंडिया’ के विशेष प्रदर्शन के अवसर पर बुधवार (5 अगस्त) को लोकभवन में इस सम्मान समारोह का आयोजन किया गया।

    समारोह में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधान परिषद के सभापति राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला एवं बाल विकास मंत्री अदिती तटकरे, मुंबई की महापौर ऋतु तावडे, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय की कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, भारतीय दृष्टिबाधित महिला राष्ट्रीय क्रिकेट टीम के खिलाड़ी, टीम के अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के., मुख्य प्रशिक्षिका शिखा शेट्टी तथा दिव्यांगजनों के विद्यालयों एवं संस्थाओं के प्रतिनिधि बड़ी संख्या में उपस्थित थे।

    इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि कुछ दिन पहले उन्होंने ‘देख ले! इंडिया’ का ट्रेलर देखा था। यह वृत्तचित्र केवल किसी क्रिकेट टीम की जीत की कहानी नहीं है, बल्कि दृष्टिबाधित महिला खिलाड़ियों के सामाजिक एवं आर्थिक संघर्ष, परिवार के प्रति उनके उत्तरदायित्व, समान अवसरों के लिए उनके संघर्ष तथा कठिन परिश्रम से अर्जित सफलता का सजीव दस्तावेज है। इसी प्रेरणा से लोकभवन में इस वृत्तचित्र के विशेष प्रदर्शन का आयोजन किया गया।

    राज्यपाल ने कहा कि इन खिलाड़ियों ने केवल विश्व कप ही नहीं जीता, बल्कि करोड़ों भारतीयों का हृदय भी जीत लिया है। उन्होंने कहा कि इस प्रेरणादायी वृत्तचित्र का प्रदर्शन अधिकाधिक विद्यालयों, महाविद्यालयों और विश्वविद्यालयों में किया जाना चाहिए, ताकि युवा पीढ़ी इन खिलाड़ियों के संघर्ष और उपलब्धियों से प्रेरणा प्राप्त कर सके। उन्होंने संबंधित अधिकारियों को इस संबंध में आवश्यक पहल करने के निर्देश देने की बात भी कही।

    राज्यपाल ने विश्वविद्यालयों से आग्रह किया कि वे दिव्यांग खिलाड़ियों को अभ्यास के लिए अपनी खेल सुविधाएँ उपलब्ध कराएँ। उन्होंने सरकारी संस्थानों, सार्वजनिक उपक्रमों, कॉर्पोरेट क्षेत्र तथा निजी संस्थानों से भी दिव्यांग खिलाड़ियों को रोजगार के अवसर प्रदान करने का आह्वान किया।

    उन्होंने कहा कि आज सूचना और तकनीक के इस युग में मनोरंजन के अनेक साधन उपलब्ध हैं, किंतु बहुत कम रचनाएँ ऐसी होती हैं जो जीवन में वास्तविक प्रेरणा देती हैं। ‘देख ले! इंडिया’ ऐसा ही एक प्रेरणादायी वृत्तचित्र है, जो साहस, आत्मविश्वास और दृढ़ संकल्प का संदेश देता है।

    राज्यपाल ने कहा कि भारत में क्रिकेट खिलाड़ियों को व्यापक सम्मान और प्रायोजन प्राप्त होता है, किंतु प्रतिभा होने के बावजूद दिव्यांग खिलाड़ियों को अभी भी अपेक्षित पहचान नहीं मिल पाती। देश के विभिन्न भागों से आने वाली इन दृष्टिबाधित महिला खिलाड़ियों ने गरीबी, पारिवारिक विरोध और शारीरिक चुनौतियों का सामना करते हुए जिस प्रकार विश्व विजेता बनने का गौरव प्राप्त किया है, वह अत्यंत प्रशंसनीय और प्रेरणादायी है।

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने कोलंबो में आयोजित फाइनल मुकाबले में नेपाल को पराजित कर विश्व कप जीतने पर भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेट टीम को बधाई दी। उन्होंने कहा कि यह विजय केवल खेल की नहीं, बल्कि आत्मविश्वास, साहस और अटूट इच्छाशक्ति की जीत है। उन्होंने कहा कि दिव्यांग खिलाड़ियों को सहानुभूति नहीं, बल्कि अवसर चाहिए, और अवसर मिलने पर उन्होंने उसे स्वर्णिम उपलब्धि में बदलकर दिखाया है। उन्होंने ‘देख ले! इंडिया’ की निर्माता शांति मोहन तथा निर्देशक मुकुंद मूर्ति को भी बधाई दी।

    इस अवसर पर राज्यपाल ने खेल रत्न एवं अर्जुन पुरस्कार से सम्मानित दिव्यांग खिलाड़ी डॉ. दीपा मलिक का भी सम्मान किया।

    समारोह में भारतीय दृष्टिबाधित महिला क्रिकेट टीम की सदस्य सिमू दास, प्रिया खीर, अनु कुमारी, जमुना रानी टुडू, काव्या, अनेखा देवी, बसंती हंसदा, सिमरनजीत कौर, सुनीता सराटे, पार्वती मरांडी, टीम की कप्तान दीपिका टी. सी., फूला सोरेन, उपकप्तान गंगा कदम, काव्या एन. आर., सुषमा पटेल तथा दुर्गा येवले का सम्मान किया गया। इसके साथ ही क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) के अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के. तथा वृत्तचित्र के निर्माता एवं निर्देशक को भी सम्मानित किया गया।

    **