24.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा
राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा
कर विभागाचा ‘भीतीदायक यंत्रणा’ ते ‘जनस्नेही संस्था’ हा प्रवास सुखावणारा: राज्यपाल
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून आणि करदात्यांचा विश्वास संपादन करून स्वतःला जनस्नेही संस्थेमध्ये रूपांतरित केल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज आयकर विभागाचे अभिनंदन केले. “एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,” असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस विभागाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आयकर विभागाचे योगदान अधिक महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कर महसुलामुळे देशात सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य झाली असून, देशाच्या प्रगतीत विभागाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, मुंबईने देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपले स्थान कायम राखले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मुंबई मेट्रोचा , कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगून, या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यासाठी सक्षम शहर उभारण्यास मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अग्रीम कर’ हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगून प्रत्येक करदात्याने अग्रीम कर आपली सामाजिक जबाबदारी समजून भरावा, असे आवाहन केले.
मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याइतकी सुलभ झाल्याचे सांगितले. सन २०१९ मध्ये आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया करण्यासाठी ८२ दिवस लागत असताना आज ती काही दिवसांत पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. परताव्याची (रिफंड) रक्कमही अत्यंत जलद दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आयकर विभाग सर्व शासकीय विभागांमध्ये आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मुंबईचे योगदान अनेक राज्यांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिनेते विकी कौशल यांनी आयकर विभागाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देत आयकर दिन समारंभात सहभागी होताना अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
*****
मुंबई में 167वाँ आयकर दिवस समारोह आयोजित
‘डर पैदा करने वाले विभाग’ से ‘जनमित्र संस्था’ बना आयकर विभाग : राज्यपाल
महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आयकर विभाग की पारदर्शिता बढ़ाने, मुकदमों में कमी लाने, कर अनुपालन को सरल बनाने तथा करदाताओं का विश्वास मजबूत करने के प्रयासों की सराहना करते हुए कहा कि विभाग ने स्वयं को एक जनमित्र संस्था के रूप में स्थापित किया है। उन्होंने कहा कि कभी ‘डर पैदा करने वाले टैक्समैन’ के रूप में पहचाना जाने वाला आयकर विभाग आज एक ‘मित्रवत संस्था’ बन गया है।
राज्यपाल शुक्रवार (24 जुलाई) को मुंबई के बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित कौटिल्य भवन में आयोजित 167वें आयकर दिवस समारोह को संबोधित कर रहे थे।
उन्होंने कहा कि भारत के 5 ट्रिलियन डॉलर से अधिक की अर्थव्यवस्था बनने के लक्ष्य की दिशा में आयकर विभाग की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण है। करों से प्राप्त राजस्व के माध्यम से विद्यालयों, अस्पतालों, सड़कों, आधारभूत संरचना तथा विभिन्न जनकल्याणकारी योजनाओं का निर्माण संभव हुआ है, जो देश की प्रगति का आधार है।
राज्यपाल ने इस बात पर गर्व व्यक्त किया कि प्रत्यक्ष कर संग्रह में महाराष्ट्र देश में अग्रणी बना हुआ है तथा मुंबई देश की आर्थिक राजधानी के रूप में अपनी पहचान बनाए हुए है।
मुंबई मेट्रो विस्तार, कोस्टल रोड परियोजना, मुंबई ट्रांस हार्बर लिंक तथा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर जैसी महत्वाकांक्षी परियोजनाओं का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि ये करदाताओं के योगदान के प्रत्यक्ष उदाहरण हैं, जो बेहतर परिवहन, मजबूत संपर्क, आर्थिक विकास और भविष्य के आधुनिक शहर के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं।
राज्यपाल ने कहा कि एडवांस टैक्स राष्ट्र की प्रगति में महत्वपूर्ण योगदान देता है और प्रत्येक करदाता को इसे अपनी सामाजिक जिम्मेदारी के रूप में देखना चाहिए।
प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई श्री आलोक कुमार ने कहा कि आज आयकर रिटर्न दाखिल करना ऑनलाइन किराना या भोजन ऑर्डर करने जितना सरल हो गया है। उन्होंने बताया कि वर्ष 2019 में आयकर रिटर्न की प्रक्रिया पूरी होने में 82 दिन लगते थे, जबकि अब यह कुछ ही दिनों में पूरी हो जाती है। रिफंड भी बहुत कम समय में जारी किया जा रहा है। उन्होंने कहा कि नई तकनीक अपनाने में आयकर विभाग सरकार के सभी विभागों में अग्रणी है। उन्होंने यह भी कहा कि राष्ट्रीय आय में मुंबई का योगदान देश के अनेक राज्यों से अधिक है।
फिल्म अभिनेता विक्की कौशल ने आयकर विभाग को स्थापना दिवस की शुभकामनाएँ देते हुए कहा कि आयकर दिवस समारोह का हिस्सा बनना उनके लिए गर्व की बात है।
*****