20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा
Zoom 20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.