20.06.2026 : West Bengal State Foundation Day Celebrated at Maharashtra Lok Bhavan
Zoom 20.06.2026 : The West Bengal State Foundation Day was celebrated in Maharashtra Lok Bhavan. Maharashtra Governor Jishnu Dev Varma greeted the people of West Bengal living in Maharashtra and elsewhere on the occasion. A video message of West Bengal Governor R N Ravi was screened on the occasion. Students of the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University presented a cultural programme comprising music and dance of West Bengal to commemorate the occasion. Vice Chancellor of the University Prof Prakash Mahanvar, Joint Secretary to the Governor S Ramamoorthy, cultural coordinators, officers and staff of Lok Bhavan and school children from various schools in Mumbai were present.
20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.