लक्झेमबर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
लक्झेमबर्गच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
लक्झेमबर्ग या युरापिय देशाचे भारतातील राजदूत जीन क्लाउडे क्यूगनर यांनी गुरुवारी (दि. २१) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
लक्झेमबर्ग देशाने जगातील पहिले हरित स्टॉक एक्सचेंज सुरु केले असून ते मुंबई स्टॉक एक्सचेंजशी सहकार्य करीत असल्याचे राजदूतांनी सांगितले. लक्झेमबर्ग स्टील उत्पादनात अग्रेसर असून लवकरच कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित स्टील निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टील उदयोग, फिनटेक उदयोग याशिवाय लक्झेमबर्गने महाराष्ट्राला पर्यटन विकास क्षेत्रात सहकार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली.
बैठकीला लक्झेमबर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्सिस बिलिमोरिया हे देखील उपस्थित होते.