बंद

    19.11.2025: राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान-राज्यपाल आचार्य देवव्रत

    प्रकाशित तारीख : November 19, 2025
    19.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जेबीएम समूहातर्फे चाकण, पुणे येथे विविध कॉर्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांचा समावेश असलेला 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रम संपन्न झाला. समूहाचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार आर्य यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी राज्यपालांनी अहिल्यानगर येथे सुरु करण्यात आलेल्या स्वामी विरजानंद कन्या गुरुकुल संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. जेबीएम समूहाचे उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल, शासकीय अधिकारी तसेच समूहाचे सदस्य उपस्थित होते.  'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमांतर्गत गर्भाशयाच्या कर्करोग तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबिराचे आयोजन, व्हीलचेअरचे वाटप, आदी उपक्रम घेण्यात आले.

    राष्ट्रनिर्मितीमध्ये जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान-राज्यपाल आचार्य देवव्रत

    पुणे, दि.१९: जेबीएम समुहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, ऑटोमोबाईल उत्पादन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय काम केले आहे. उद्योग उभारणीसोबतच राष्ट्र-निर्मितीतही जेबीएम समूहाचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

    जेबीएम समूहाच्या आयोजित ‘सर्वोत्कर्ष’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेबीएम समूहाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्या, उपाध्यक्ष निशांत आर्या, आर्या समाजाचे प्रतिनिधी विनय आर्या, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता, सुशील बिंदल समूहाचे सदस्य उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी ‘स्वदेशी’, ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्याचा नारा दिला आहे. यादृष्टीने जेबीएम समूहाची देशात 60 आणि विदेशात 17 उद्योग संस्था कार्यरत असून याद्वारे हजारो युवकांना रोजगार मिळत आहे. येथील पर्यावरणपूर्वक बसेसची निर्मिती केली जात असून याद्वारे पर्यावरणाचे संवर्धनही केले जात आहे. या बसेस विदेशातही निर्यात करुन देशाच्या जीडीपीमध्ये वाढ करण्याचे काम होत आहे. तसेच त्या देशाची शोभा वाढविण्याचे काम करीत आहेत. आपली एक स्वंतत्र ओळख निर्माण केली आहे. देशाचे गौरव वाढविण्यासोबत स्वदेशी मोहिमेला पुढे नेण्याचे काम समुहामार्फत होत आहे.

    जेबीएम समूहाच्यावतीने अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्या यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून ते पुढे म्हणाले, महर्षी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, मुल्य, नशा मुक्ती अभियान, महिलांना सन्मानाने वागणूक, शिक्षणाचा अधिकाराला प्रोत्सहान दिले, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कुप्रथेला आळा घालून समाजिक परिर्वतनाचे मोठे कार्य केले. स्वातंत्र्याच्या लढ्यातही आर्यसमाजाचे सक्रीय सहभाग घेतला. महर्षी दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाच्या कार्याची प्रेरणा घेवून संपूर्ण आर्या कुटुंबीय वाटचाल करीत आहेत. ‘सर्वाच्या कल्याणातून आपले कल्याण’ ही वृत्ती जोपासत जेबीएम समुहाने सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे समाजसेवा आणि वंचितांच्या कल्याणासाठी करीत असलेले कार्य प्रेरणादायी आहे, यापुढेही समुहाने देश व समाजाच्या कल्याणारिता कार्य करीत राहावे, असेही श्री. देवव्रत यांनी केले.

    कार्यकामापूर्वी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या ‘हॉट स्टॅम्पिंग’ प्रकल्पाचे भूमिपूजन करुन कोनाशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर)’ तपासणीकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. या रुग्णवाहिकेद्वारे मुलीच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जेबीएम उद्योग समूहातील उत्पादनाविषयी माहिती घेवून समाधान व्यक्त केले.

    श्री. आर्या म्हणाले, जेबीएम समूहाद्वारे देश व समाज कल्याणाकरिता आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासकीय सेवा, आदी विषयात लोककल्याणकारी उपक्रम राबवून नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम करीत आहेत, भारतीय संस्कृती, संस्कार, मूल्य, आणि राष्ट्रभक्ती जपण्याचे काम करीत आहे, असेही श्री. आर्या म्हणाले.

    श्री. विनय गुप्ता म्हणाले, ‘सर्वोत्कर्ष’ या संकल्पेनुसार जेबीएल समूह समाज कल्याणाकरिता समर्पित भावनेने काम करीत आहेत, आर्य समाजाच्या कल्याणाकरिता करीत असलेले कार्य प्रेरणादायी आहे, असेही श्री. आर्या म्हणाले.