15.07.2025: श्री गुंडी यात्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती

श्री गुंडी यात्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती
राजभवनातील प्राचीन श्री गुंडी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. १५) देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले व भाविकांसमवेत आरती केली.
यावेळी राज्यपालांनी मंदिर परिसरातील दुर्गा माता, महालक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तींचे देखील दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्री गुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.