13.06.2024: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ थाटात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
६४ वा दीक्षांत समारंभ थाटात
– मा.कुलपती रमेशजी बैस यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा
– ’एनसीएल’चे संचालक डॉ.अशिष लेले यांचे केले दीक्षांत भाषण
– ४१ पीएच.डी धारकांना व्यासपीठावर पदवी प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ मा.कुलपती तथा राज्यपाल श्री.रमेशजी बैस यांच्या अध्यक्षतेखाली व ’एनसीएल’चे संचालक डॉ.अशिष लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.१३) थाटात संपन्न झाला.
हा दीक्षांत समारंभ गुरुवारी सकाळी १० ते ११ या वेळीत विद्यापीठ नाटयगृहात झाला. यावेळी कुलगुरु डॉ.विजय
फुलारी, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.बीना हुबे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, डॉ.भगवान साखळे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.अवुंâश कदम, नितीन जाधव, डॉ.योगिता होके पाटील, अॅड.दत्तात्रय भांगे, डॉ.व्यंकट लांब, डॉ.अपर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२२ व मार्च-एप्रिल २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदव्यूत्तर विद्याथ्र्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच २७ जून २०२३ ते आजतागायत पीएच.डी प्राप्त १३९ संशोधकांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. मा.राजभवन यांच्या वतीने दीक्षांत सोहळयाच्या ’मिनिट टू मिनिट’ प्रमाणे सोहळयाचे आयोजन करण्यात झाले. मा.कुलपती श्री.रमेश जी बैस हे ’राजभवना’तून अभासी पध्दतीने सहभागी झाले. विद्यापीठाच्यावतीने r मा.कुलपती श्री.रमेश बैस यांचा माजी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
४१ संशोधकांना व्यासपीठावर पदवी प्रदान
मा.राजभवन यांच्यावतीने या सोहळयासाठी दीड तासांचा वेळ देण्यात आला. तर पीएच.डी.पदवी वितरणासाठी २३ मिनिटांचा वेळ राखीव होता. या संदर्भात विद्या परिषद ५ जून व व्यवस्थापन परिषदेची बैठक ७ जून रोजी घेण्यात आला. या ठरावाप्रमाणे पदवी प्रमाणपत्राचे वाटत करण्यात आले. सर्व विद्याशाखेतून प्रत्येक विषयातील या वर्षांतील पहिल्या पीएच.डी धारकास व्यासपीठावर ४१ संशोधक विद्याथ्र्यांना पदवी प्रदान करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. प्रथम पदवीप्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे – २८ जून २०२३ नंतर पीएच.डी प्राप्त व नोंदणी केलेली. विद्याशाखा निहाय विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे . विज्ञान व तंत्रज्ञान – १०, मानव्यविद्या – १४, वाणिज्य व व्यवस्थापन – ०३, आंतरविद्या शाखा – ०५ संशोधक अशा ४१ जणांना व्यासपीठावर पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. या शाखांच्या पदव्या संदर्भात वाचन अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे व डॉ.वीना हुंबे यांनी केले. परीक्षा मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी पीएच.डी धारकांच्या यादीचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मुस्तजिब खान व प्रा.पराग हासे यांनी केले. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. सोहळयाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.
मान्यवरांची भाषणे
शोधा म्हणजे सापडेल : डॉ.अशिष लेले
एका बाजूला ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. तथापि आजच्या जगात अनेक प्रकारची गुंतागुंत असून विविध प्रश्नही निर्माण झाले आहेत. सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे आणि नवी दिना देण्याचे काम तरुण्यांचे आहे. आपल्यासाठी संधीचे एक दार बंद झाले तर दुसरे उघडायचे असते. एक रस्ता बंद झाला असेल तर दुसरा नवा ’पथ’ शोधून ध्ययेपूर्ती करायची असते. आयुष्यात ’पर्पज’, ’प्रिजव्र्हन्स’ व ’पॅशन’ हे तीन ’पी’ महत्वाचे आहेत, याची जाणीव ठेवा, असे आवाहनही ’एनसीएल’चे संचालक डॉ.अशिष लेले यांनी केले.
दहा वर्षात ’टॉप ५०’चे ध्येय ठेवा : मा.कुलपती
मराठवाडयाच्या अत्यंत वैभवशाली व प्राचीन परंपरंचा वारसा पुढे नेण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. ’विकसीत भारत’चे ध्येय आपणास साकार करावयाचे असेल तर आगामी दहा वर्षात देशातील ’टॉप ५०’ विद्यापीठामध्ये क्रमांक मिळविण्याचे ध्येय समोर ठेवून काम करा, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल श्री.रमेशजी बैस यांनी केले. सुमारे सात मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांचा उहापोह केला.
समाजाभिमुख संशोधनास प्राधान्य : कुलगुरू
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे ‘फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युटस्’ घडविणारे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. पारदर्शक प्रशासन, उच्च शैक्षणिक दर्जा, समाजाभिमुख संशोधन यासाठी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विद्यापीठाने काही महत्वाची पावले उचलली आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेला ‘आंतर विद्या शाखीय दृष्टीकोन’ समोर ठेऊन आम्ही अध्ययन, संशोधनावर दिला आहे.केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात पीएम उषा प्रकल्पातंर्गत शंभर कोटींचा निधी घोषित केला आहे. अत्यन्त उत्तम रितीने आम्ही हा प्रकल्प राबविणार आहोत. शिक्षणासोबतच संशोधन हेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने ’रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेल’ स्थापन केला असून ‘संशोधन व नवोन्मेष’ समाजपयोगी असावे या हेतून संशोधन प्रकल्प राबविण्यात आले.विद्यापीठ निधीून हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षात केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाने ‘एनबीए’चे मानांकन मिळविले आहे. या सर्व सकारात्मक बाबी समोर ठेऊन विद्यापीठाने प्रगतीच्या दिशेने ‘टेकऑफ’ घेतला आहे, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी स्वागतपर भाषणात म्हणाले.