बंद

    21.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन

    प्रकाशित तारीख: May 21, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन

    जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले प्रशासनाच्यावतीने स्वागत

    सातारा, दि. 21 :- राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

    राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजकेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.

    जिल्हा माहिती कार्यालय, सातारा