13.02.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा ११ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न
13.02.2024 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न झाला. यावेळी १७९० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य देण्यात देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. दीक्षांत समारोहाला पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विद्यापीठ मथुराचे कुलगुरु डॉ ए के श्रीवास्तव, माफसुचे कुलगुरु डॉ नितीन पाटील, विद्यापीठाचे माजी कुलगुरु, इतर विद्यापीठांचे कुलगुरु, विभाग प्रमुख, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.