07.01.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत सैन्य दलातील विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत सैन्य दलातील विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न
शौर्य पदकांनी विभूषित सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवानांच्या तिसऱ्या वार्षिक संचलनाला “परेड ऑफ व्हेटरन्स” राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी एनसीपीए मुंबई येथून झेंडा दाखवून रवाना केले.
राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. ‘परेड ऑफ व्हेटरन्स’चे आयोजन नेव्ही फाउंडेशनच्या मुंबई शाखेने भारतीय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या सहकार्याने केले होते.
यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय सिंह, नेव्ही फाउंडेशन मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते. परेडमध्ये 90 वर्षांचे कॅप्टन राज मोहिंद्रा तसेच नाईक दीपचंद हे देखील सहभाग झाले होते.