28.06.2023 : बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला विशेषत: आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद-उल-झुआ हा प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करतांना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या कल्याणाचा सर्वसमावेशक विचार केला आहे. या निमित्ताने आपण सर्वजण समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी तसेच मानवजातीच्या सेवेसाठी एकत्र कार्य करू या. असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.