29.05.2022 : राज्यपालांच्या हस्ते ‘कथा साहित्य का पुनर्पाठ’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
29.05.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'कथा साहित्य का पुनर्पाठ' या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
29.05.2022 : मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय लिखित 'कथा साहित्य का पुनर्पाठ' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. अकॅडेमिस्तान, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आयोजित प्रकाशन सोहळ्याला समाज सेविका सुमिता सुमन सिंह, अकॅडेमिस्तानचे संस्थापक दीपक मुकादम, वीरेंद्र याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. लेखक करुणाशंकर उपाध्याय यांच्या मते देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना लिहिलेल्या या पुस्तकात सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर सुरु झालेल्या हिंदी पुनर्जागरणापासून समकालीन लेखक व कादंबरीकार यांच्या लिखाणाचे विश्लेषण करण्यात आले आहे.