20.08.2020 : राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे सदभावना दिवस प्रतिज्ञा
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे सदभावना दिवस प्रतिज्ञा
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त आज (दि.20) राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सदभावना दिवस प्रतिज्ञा घेतली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजलि वाहिली व सर्वांना सदभावना दिवस प्रतिज्ञ दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.