बंद
    • 27.01.2025:  वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची निरपराध ज्यू मृतात्म्यांना श्रद्धांजली

      27.01.2025: वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची निरपराध ज्यू मृतात्म्यांना श्रद्धांजली

    • 27.01.2025: कोपर खैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झाल. यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

      27.01.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कोपर खैरणे येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न

    • 26.01.2025:  देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, अमृता फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, आमदार अमीन पटेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ हेमलता बागला, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायक उदित नारायण,   वर्षा उसगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मुंबईचे मावळते आर्चबिशप ऑस्वाल्ड ग्रेशिअस व नवे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

      26.01.2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

    • 26.01.2025: देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार व गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

      26.01.2025: प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

    • Republic Day: Governor C. P. Radhakrishnan unfurls National Tricolour at Raj Bhavan

      26.01.2025: प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

    • 24.01.2025 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी घेतली राज्यपालांची भेट

      24.01.2025 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • 24.01.2025:  राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

      24.01.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे उत्तर प्रदेश तसेच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …