बंद

    19.11.2025 : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या  १०८ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या खाजगी सचिव अर्चना गायकवाड व  राज्यपालांच्या अवर सचिव (प्रशासन) (प्र.) करुणा वावडणकर यांनी इंदिरा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थित राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  दरवर्षी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी उपस्थितांनी देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी  निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची शपथ  घेतली.

    19.11.2025: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन

    दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०८ व्या…

    तपशील पहा
    18.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडी येथील निसर्गग्राम येथे आठवा निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला. यावेळी निसर्गोपचाराशी संबंधित पुस्तकांचे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांच्या विजेत्या महाविद्यालय, वैद्यकीय व्यवसायी, उत्कृष्ट विद्यार्थी यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग आदी उपस्थित होते. राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, निसर्ग ग्राम येथील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह निसर्गोपचार वैद्यकीय व्यवसायी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

    18.11.2025 राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज…

    तपशील पहा
    18.11.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज पुणे येथील कृषी महाविद्यालय येथे आयोजित नैसर्गिक कृषी परिषदेला संबोधित केले.  नैसर्गिक कृषी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी,  पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन.,राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी विभागाचे अधिकारी, राज्य आणि गुजरात येथील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, महाराष्ट्राच्या कृषी विभागांतर्गत विविध कार्यालयांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषी सल्लागार, कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

    18.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती…

    तपशील पहा
    16.11.2025: महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज 'नैसर्गिक कृषी - अनुपम भारतीय वारसा' या विषयावर प्रशासकीय, पोलीस व राजस्व तसेच इतर सेवेतील अधिकारी व स्वयंसेवकांशी राजभवन मुंबई येथे संवाद साधला.  संकल्प फाउंडेशनच्या वतीने या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा, संकल्प फाउंडेशनचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

    16.11.2025: प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी: राज्यपाल आचार्य देवव्रत

    रसायनांच्या अति वापरामुळे शेतजमीत ओसाड झाली आहे विषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही प्रशासकीय…

    तपशील पहा
    16.11.2025:  महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते आज जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील पोस्टेज स्टॅम्प व स्मृती मुद्रेचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले.  कार्यक्रमाचे आयोजन जसकरण बोथरा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, जसकरण बोथरा फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ बोथरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

    16.11.2025: महाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन

    महाराष्ट्र व पंजाब राज्यपालांच्या हस्ते आचार्य जवाहर लाल स्मृती मुद्रा व टपाल तिकिटाचे प्रकाशन देश…

    तपशील पहा
    14.11.2025:  देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राजभवन येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक ले.  विक्रम कुमार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेल्या  पोलीस अधिकारी व अमलदारांनी देखील पंडित  नेहरू यांना अभिवादन केले.

    14.11.2025: पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू…

    तपशील पहा

    13.11.2025 : नैसर्गिक शेती परिषदेच्या आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी घेतली आढावा बैठक

    नैसर्गिक शेती परिषदेच्या आयोजनासंदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी घेतली आढावा बैठक राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिनांक १८…

    तपशील पहा
    राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

    13.11.2025 : राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न

    राजभवन येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कौशल्यवर्धन प्रशिक्षण शिबीर संपन्न महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनानुसार राजभवनातील…

    तपशील पहा
    09.11.2025:  राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अहमदाबाद येथे प्राकृतिक चिकित्सा दिवस पर्वाचे उद्घाटन केले. साबरमती रिव्हरफ्रंटवर ६८५ लोकांनी सामूहिकपणे केलेले वृक्षासन, फेस-मड पॅक आणि सूर्यस्नान करून IEA आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्थान प्राप्त केले.

    09.11.2025: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केला प्राकृतिक चिकित्सा दिवस पर्वाचा शुभारंभ

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केला प्राकृतिक चिकित्सा दिवस पर्वाचा शुभारंभ ६८५ लोकांनी केलेले एकत्रित सूर्यस्नान,…

    तपशील पहा
    07.11.2025:  बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या सार्धशताब्दी निमित्त राजभवन येथे संपूर्ण 'वंदे मातरम' गीताचे  सामूहिक गायन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी 'वंदे मातरम'चे  सामूहिक गायन केले. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या  'वंदे मातरम् ' या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे 'वंदे मातरम्' या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    07.11.2025: ‘वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी

    ‘वंदे मातरम गीताची सार्धशताब्दी ‘राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले’ बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम्…

    तपशील पहा
    Raj Bhavan offers tributes to Sardar Vallabhbhai Patel, Indira Gandhi

    31.10.2025: सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन

    सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राजभवन येथे अभिवादन अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली…

    तपशील पहा
    29.10.2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडिया मेरीटाइम वीक 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव मुंबई येथे आयोजित इंडिया मेरीटाइम वीक 2025 मधील मेरीटाइम लीडर्स कॉन्क्लेव्हला पंतप्रधानांनी संबोधित केले. बंदर पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि संरक्षण जहाजबांधणी या क्षेत्रांतील धोरणनिर्माते, विचारवंत आणि सागरी तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय बंदरे, जलमार्ग व नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्यमंत्री शांतनू ठाकूर, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते.

    29.10.2025:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले…

    तपशील पहा