बंद

  31.12.202021: नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: December 31, 2021

  नवर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  करोना संसर्गामुळे २०२१ हे वर्ष देखील संपूर्ण जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक असे होते.

  भारतातील लोकांनी मात्र शाश्वत मानवी मुल्ये, सर्व धर्मांची शिकवण व सेवाभाव यामुळे करोनाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले.

  करोनाचे आवाहन अद्याप संपलेले नाही, त्यामुळे यानंतर देखील सावधगिरी बाळगलीच पाहिजे.

  यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्याला आपले राज्य सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर न्यावयाचे आहे.

  या दृष्टीने प्रत्येकाने राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे.

  २०२२ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, निरामय जीवन व समृद्धी प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.