बंद

    30.04.2021 : “ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते”: राज्यपाल कोश्यारी

    प्रकाशित तारीख: April 30, 2021

    “ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते”: राज्यपाल कोश्यारी

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विधिज्ञ तसेच माजी ऍटर्नी जनरल पद्म विभुषण सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    सोली सोराबजी देशातील घटनातज्ञ आणि विधिज्ञांमध्ये अतिशय आदरणीय नाव होते. सोराबजी मुलभूत अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय घटनांवर अभ्यासपूर्ण व्यक्त होणारे ते प्रखर विचारवंत होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक महान विधिज्ञ आणि विचारवंत गमावला आहे. मी दिवंगत सोराबजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.