बंद

  29.12.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

  प्रकाशित तारीख: December 29, 2021

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

  पुणे, दि. 29 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती जाणून घेतली.

  यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते.

  राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हरू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. आपले मनोबल उच्च असून स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करा. आपल्यांपैकी काहींनी खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून आपण समाजापुढे आदर्श आहात. आपल्यातील कौशल्यांना वाव द्या, असे आवाहन करत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले.