बंद

    29.07.2021 : शिवशाहीरांचे राज्यपालांकडून अभिष्टचिंतन

    प्रकाशित तारीख: July 29, 2021

    शिवशाहीरांचे राज्यपालांकडून अभिष्टचिंतन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यपालांनी पुरंदरे यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

    “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शतकी वर्षातील पदार्पणानिमित अभिष्टचिंतन आणि दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे राज्यपालांनी आपल्या ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.