बंद

  29.04.2022 : उपराष्ट्रपतींचे नागपूर येथे आगमन, स्वागत

  प्रकाशित तारीख: April 29, 2022

  उपराष्ट्रपतींचे नागपूर येथे आगमन, स्वागत

  उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.

  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, जिल्हाधिकारी आर विमला व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीला उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत.