29.03.2022: राज्यपालांच्या हस्ते डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न
राज्यपालांच्या हस्ते डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन संपन्न
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ कृपाशंकर मिश्र यांच्या ‘स्तुत्य’ व ‘देवि उर्मिला’ या दोन हिंदी काव्यसंग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.
‘स्तुत्य’ हा काव्यसंग्रह भारतीय महापुरुषांच्या त्याग व बलिदानाची शौर्यगाथा आहे, तर ‘देवि उर्मिला’ का काव्यसंग्रह प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण यांच्या धर्मपत्नी देवी उर्मिलेच्या त्याग व संमर्पणावर आधारित काव्य आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ सागर त्रिपाठी, डॉ संगिता मिश्र, हरिशंकर मिश्र व गांधी विचार मंचचे महासचिव मिथिलेश मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते.