बंद

    28.11.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘यथाकथा आंतरराष्ट्रीयचित्रपट व साहित्य महोत्सवाचे समापन संपन्न

    प्रकाशित तारीख: November 29, 2021
    28.11.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत 'यथाकथा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समापन संपन्न

    28.11.2021: ‘यथाकथा’ या पहिल्या ४ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट व साहित्य महोत्सवाचा सांगता समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला यथाकथा चित्रपट व साहित्य महोत्सवाच्या संस्थापिका चारू शर्मा, नानावटी महाविद्यालयाचे विश्वस्त अपूर्वा नानावटी, राजपिपला घराण्याचे युवराज मानवेंद्र सिंह गोहिल, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट परीक्षक व स्तंभलेखक पियुष रॉय तसेच साहित्य व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.