28.09.2024: ब्रिटनचे मुंबईतील उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी घेतली राज्यपालांची भेट
ब्रिटनचे मुंबईतील उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी घेतली राज्यपालांची भेट
ब्रिटनचे मुंबईतील उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी भारत व ब्रिटनमध्ये व्यापार, उद्योग तसेच शैक्षणिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली.