बंद

    28.04.2021 :करोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना

    प्रकाशित तारीख: April 28, 2021

    करोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना

    सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका बैठकीच्या वेळी केली.

    शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.

    सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील करोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.