बंद

    28.04.2021: एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: April 28, 2021

    एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी राज्यमंत्री व मुंबईचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    श्री एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे तसेच राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला आहे. दिवंगत श्री गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कन्या तसेच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना व त्यांच्या इतर कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे..