बंद

    28.01.2023 : कुलगुरु दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: January 28, 2023

    कुलगुरु दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनाचे वृत्त समजुन अतिशय दुःख झाले. डॉ मालखेडे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात आणि विशेषतः गुणवत्ता वाढविण्याच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो.