बंद

    27.12.2023:राजभवन येथे पंजाबराव देशमुख यांना आदरांजली

    प्रकाशित तारीख: December 27, 2023

    राजभवन येथे पंजाबराव देशमुख यांना आदरांजली

    भारताचे प्रथम कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे स्व. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सच‍िव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून . भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना आदराजंली वाहिली.