26.12.2024: जोरावर सिंह व फतेह सिंह यांना राजभवन येथे अभिवादन
जोरावर सिंह व फतेह सिंह यांना राजभवन येथे अभिवादन
राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आज (दि 26) ‘वीर बाल दिवस’ निमित्ताने साहिबजादा जोरावर सिंह व साहिबजादा फतेह सिंह यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेला राजभवन, मुंबई येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजभवन मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.