बंद

    26.10.2021: राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप

    प्रकाशित तारीख: October 26, 2021

    राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप

    डॉ संजय ओक, डॉ उदवाडीया, डॉ म्हैसेकर सन्मानित

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा करोना काळातील सेवेबददल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

    संपुर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली.

    दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड कृती दलाने प्रत्येक सोमवारी न चुकता ऑनलाईन बैठक घेतली, तसेच जगाच्या विविध भागातील करोना परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला व औषध योजना केली तसेच लसीकरणाची आखणी केली असे कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी राज्यपालांना सांगितले.

    यावेळी डॉ संजय ओक यांचेसह डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ झरीर उदवाडीया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरसकर, डॉ. नितीन कर्णिक, डॉ. झहिर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ खुस्राव बाजन, डॉ अजित देसाई तसेच मृणाल कोले यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.