बंद

    26.10.2021: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख: October 26, 2021

    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

    राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली, तसेच मान्यवरांच्या संदेशाचे वाचन केले.

    दि. २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘स्वतंत्र भारत @ ७५: सत्यनिष्ठा से आत्मनिर्भरता’ असे या सप्ताहाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे.