बंद

    26.08.2025: गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त राज्यपालांच्याकडून शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: August 26, 2025

    गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त राज्यपालांच्याकडून शुभेच्छा

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सव आज केवळ राष्ट्रीयच नाही तसेच वैश्विक उत्सव झाला आहे. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रासाठी केलेल्या त्याग व समर्पणाचे स्मरण देतो. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक सौहार्द व एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करतो व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.