बंद

  26.01.2023: प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथील ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्पाचे उदघाटन

  प्रकाशित तारीख: January 27, 2023

  प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथील ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्पाचे उदघाटन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उदघाटन केले. राज्यपालांनी यावेळी राजभवन येथे नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले.

  दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात ‘अटल उद्यान’ बनविण्यात आले असून ते जपानी गार्डनच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेले.

  ‘अटल उद्यान’ तसेच जैव विविधता प्रकल्प राजभवन येथे भेट देणाऱ्या देशीविदेशी पाहुण्यांकरिता तसेच नागरिकांकरिता आकर्षण ठरणार आहे.

  राजभवनातील प्रस्तावित जैव विविधता प्रकल्प यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.