बंद

    25.12.2023 : स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: December 25, 2023

    स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन

    राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली

    भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. 26) राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सच‍िव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.