बंद

    25.12.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या ‘आव्हान-२०२३’ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न

    प्रकाशित तारीख: December 25, 2023

    राज्यपालांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या ‘आव्हान-२०२३’ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न

    महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी दूरस्थ माध्यमातून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आजपासून सुरु होत असलेल्या ‘आव्हान-२०२३’ या १० दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राजभवन, मुंबई येथून केले.

    कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल, एनएसएसचे संचालक डॉ. श्याम खंडारे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.